पारधी विकासच्या विविध योजनांसाठी लाभार्थ्यांची निवड

पारधी विकासच्या विविध योजनांसाठी लाभार्थ्यांची निवड
यवतमाळ, दि.22 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाच्यावतीने पारधी विकास योजनेंतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहे. यासाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. सदर प्राप्त अर्जातून लाभार्थी निवड दि.27 ऑगस्ट रोजी करावयाची असल्याने अर्जदारास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
पारधी समाजातील ओलिताची शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचनसाठी अर्थसहाय्य करणे लाभार्थी संख्या 20 या योजनेसाठी एक हेक्टरपेक्षा अधिक शेती असावी. शेतीचा सातबारा व उत्पन्नाचा दाखला आवश्यक. शेतीच्या सातबाऱ्यावर पाण्याच्या स्त्रोताची नोंद असावी, विद्युत व्यवस्था असावी. बेरोजगार तरुणांना रोजगाराकरीता 3 चाकी मालवाहू ट्रॉली सायकलच्या खरेदी करीता अर्थसहाय करणे लाभार्थी संख्या 35 या योजनेसाठी लाभार्थी 18 ते 35 या वयोगटातील असावा. पारधी समाजातील खेळाडू युवक, युवतींना खेळास प्रोत्साहन देण्यासाठी व 10 वी 12 वी मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसहाय्य करणे ह्या योजनेसाठी लाभार्थी संख्या 15 आहे. या योजनांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांतून लाभार्थ्यांची निवड करावयाची असल्याचे प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांनी कळविले आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...