चिखली ई. येथील एका 30 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या*

*चिखली ई. येथील एका 30 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या*
आर्णी गणेश एकंडवार आर्णी तालुक्यातील चिखली इजारा येथिल विवाहीत युवकाने घरी कोणीच नसल्याने पाहुन त्याने घरातच टिनाच्या छताखालील अँगलला पांढऱ्या शेल्याच्या सहायाने गळफास घेत आपली जिवन यात्रा संपवली सदर मृतक युवकाचे नाव दिनेश यादवराव सीडाम वय 30 वर्ष राहणार चिखली ई. ता. आर्णी जिल्हा यवतमाळ असे आहे. मृतकाने राहत्या घरात दिनाक 6 सप्टेंबर ला दुपारी 3 वाजताच्या दरम्यान गळफास घेवुन आत्महत्या केली. अशा प्रकारची फिर्याद त्यांचा भाऊ राम यादवराव सीडाम वय 34 वर्ष ह्याने आर्णी पोलीसात दाखल केल्यानंतर पोलीसांनी पंचनामा करुन प्रेत शवविच्छादन गृहात पाठविले आहे. सदर युवकाने नेमक्या कोणत्या कारणाने गळफास घेतला हे अद्याप पर्यंत समजू शकले नसून सदर घटनेची माहिती आर्णी पोलिसांना मिळताच आर्णी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व शवविच्छेदन करीता पाठविले आहे. तसेच पुढील तपास आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार मुकुंद केंद्रे, महेश गावंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद जाधव करीत आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...