जवळा येथील मंजूर घरकुलाच्या यादीमधील अतिक्रमण धारकाचे अतिक्रमण नियमाकुल करा*

*जवळा येथील मंजूर घरकुलाच्या यादीमधील अतिक्रमण धारकाचे अतिक्रमण नियमाकुल करा*
# जवळा येथील नागरिकांनी दिले जिल्हाधिकाऱ्याला निवेदन
आर्णी गणेश एकंडवार आर्णी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले जवळा ग्रामपंचायत येथील सन २०१६-१७ ते २१-२२ मध्ये मंजूर झालेले घरकुल संख्या १७१ असून ते पूर्ण लोक अतिक्रमण मध्ये राहत असून त्यांचे घरकुल मंजूर असून, राहत असलेल्या जागेवर नियमाकुल चे प्रस्ताव सदर केलेले आहे. परंतु आज पर्यंत ते मंजूर झालेले नाही.आमच्या (जवळा) गावाच्या सोबत दिलेले सर्व गावाचे प्रस्ताव नियमाकुल झाले आहे. तरी पण शेत सर्वे क्रमांक ५१२ मधील ३८ लाभार्थी २३७४१ चौरस फूट, शेत सर्वे ५०९ मधील ७२ लाभार्थी ५९७१४ चौरस फूट व शेत सर्वे २८८ मधील ६१ लाभार्थी ३६७२७ चौरस फूट जागा ही नियमाकुल करण्यात यावी याकरिता या आधी सर्व प्रस्ताव दिलेले आहे.
तरी इतर गावाचे प्रस्ताव मंजूर झाले. परंतु जवळा येथील आज पर्यंत नियमाकुलचे प्रस्ताव मंजूर झाले नाही. म्हणून गावातील अतिक्रमण धारकांनी जिल्हाधिकाऱ्याला निवेदनातून मागणी केली जवळा येथील जागा नियमाकुलचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा यावेळी जवळा ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...