महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी नागरिकांचा चक्काजाम
(एक तास वाहतुक ठप्प,वाहनाच्या दुतर्फा लांबच लांब रांगा)
महामार्गावर खड्डे पडल्याने अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याने हिवरा(संगम) येथील नागरिकांनी खड्डे तत्काळ बुजविण्याच्या मागणीसाठी आज महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले होते यावेळी वाहतूक ठप्प होवुन रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
नागपुर बोरी तुळजापूर महामार्गावर महागाव तालुक्यातील हिवरा(संगम) येथे बायपास चे काम प्रस्तावित असल्याने ज्या ठिकाणावरून बायपास चे काम सुरू होणार आहे त्या पासुन बायपास महामार्गाला जोडल्या जाणार त्या ठिकाण पर्यंत गावामधून गेलेला डांबरी रस्ता असुन त्यावरून दररोज हजारो वाहने प्रवास करतात परंतु या रस्त्यावर तीन फुट खोली व चार ते पाच फुट रुंडीचे खड्डे पडले आहेत .महामार्गावरून सुसाट वेगाने येणाऱ्या वाहनचालकांना अचानक समोर असलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत यामध्ये आता. पर्यंत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला तर काहींना अपंगत्व आले त्यामुळे हे खड्डे बुजविण्यात यावे तसेच पुस नदीवर असलेल्या पुलाला संरक्षक कठडे बसविण्यात यावे, थार रस्त्यावर असलेल्या नाल्यावरील पुलाजवळ पडलेले भगदाड बुजविण्यात यावे यासाठी आज दि.१४सप्टेंबर (शनिवार)रोजी सकाळी ११वाजता हिवरा (संगम) येथे रास्तारोको आंदोलन केले यावेळी यवतमाळ कडे जाणारे भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी सुध्दा या आंदोलनात भाग घेवुन आंदोलन कर्त्यांच्या वतीने बाजु मांडून प्रशासनाला धारेवर धरीत तत्काळ खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडले.यावेळी या आंदोलनात मुकुंद पांडे सर,अभय बोंपिलवार, विशाल कदम,उपसरपंच शरद कदम,राजु धोतरकर,सतीश पाटील,सतीश अडकिने,प्रविण जयस्वाल, आशिष गावंडे, चयन राठोड ,सुनिल ठाकरे यांच्यासह गावकऱ्यांनी सहभाग घेतला होता.या आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महागाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे,उपपोलिस निरीक्षक सागर अन्नमवार, बिट जमादार दिनेश आडे, गजानन राठोड यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.
या रास्तारोको आंदोलन चालू असताना रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी नागरिकांचा चक्काजाम (एक तास वाहतुक ठप्प,वाहनाच्या दुतर्फा लांबच लांब रांगा)
Bhagirath Raja 24 News.com
0


إرسال تعليق