आर्णीत एका तरुणाची हत्या !

*आर्णीत एका तरुणाची हत्या ! शिवीगाळ करण्याच्या कारणावरून वाद
आर्णी गणेश एकंडवार आर्णी : राजे संभाजी बाल गणेश मंडळ आर्णी या ठिकाणी 15 सप्टेंबर रोजी महाप्रसाद सुरू होता.फिर्यादी आकाश परसराम ठोंबरे व मावस भाऊ बादल टाले हा राजे संभाजी बाल गणेश मंडळ आर्णी येथे महाप्रसादाचा कार्यक्रम असल्याने तो मध्यपाशन केलेल्या अवस्थेत महाप्रसाद घेण्याकरिता त्या ठिकाणी गेला होता. फिर्यादी जेवण करीत असताना मृतक बादल टाले हा मंडळ जवळील दत्ता शिंदे यांचे घराचे बाजूला मध्यप्राशन केलेल्या अवस्थेत विनाकारण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शिवीगाळ करत होता. त्यामुळे आरोपीने आकाश भिमराव डोईफोडे वय 28 वर्ष फिर्यादी याचे मावस भावास तू कोणाला शिवीगाळ करत आहे असे विचारण्याकरता गेला व आरोपी याने मृतक बादल टाले याच्या कानाखाली मारली त्यामुळे दोघांमध्ये शिवीगाळ व मारहाण सुरू झाली. तेव्हा आरोपीने सुद्धा मृतक यास लाथा बुक्क्यांनी मारहाण केली भांडणामध्ये आरोपी कन्हैया वाघमारे मृतक चे डोके भीतीवर व सिमेंट रस्त्यावर आपटले त्यामुळे मृतक बादल टाले हा गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत पडला असता फिर्यादीने त्याला ग्रामीण रुग्णालयामध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.डॉक्टरांनी त्याचे पार्थिव शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले असून त्याबाबतचा अहवाल पोलीस स्टेशन कडे देण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही दोन्ही आरोपी संभाजीनगर येथील रहिवासी आहे. एका युवकाचा क्षुल्लक वादात बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेतील आरोपी विरुद्ध कलम 103, 352,115 (2),3(5) फिर्यादी आकाश परसराम ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करुण अन्य आरोपीची तपास मोहीम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक केशव ठाकरे, एपीआय सागर दानडे, एपीआय देशमुख, कपील मस्के यांनी दिली.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...