नागपूर तुळजापूर महामार्गावर कंटेनर पिकपचा अपघात*

*नागपूर तुळजापूर महामार्गावर कंटेनर पिकपचा अपघात* #लोणबेळ नजीक कोसधनी घाटातील घटना # एकाचा जाग्यावरच मृत्यू
आर्णी गणेश एकंडवार आर्णी दि .5 सप्टेंबर 24 रोजी 6/30 वा.चे सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरून लोनबेहळ जवळील कोसदनी घाटात वळणाचा चढ चढत असताना कंटेनर वाहन क्रमांक RJ52/ GA 52 87 महिंद्रा ब्लाझो चे चालकाने त्याचे ताब्यातील वाहन निष्काळजीपणे हाई- गईने धोकादायक रित्या राष्ट्रीय महामार्गावर मधोमध उभे करून ठेवले व वाहन उभे असल्याबाबत सुरक्षिततेचे चिन्ह रिफ्लेक्टर पार्किंग लाईट वस्तू दगड लावण्याबाबत कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली नाही.
त्यामुळे फिर्यादीचे वाहन पिकप क्रमांक एम एच 26 CH 1015 हे त्या कंटेनर ला लागून धडकले व अपघात झाला त्यामध्ये फिर्यादी चांदोबा पवारचा चुलता भगवान प्रभाकर पवार वय 46 वर्ष राहणार जुना लोहा जिल्हा नांदेड हा मरण पावला व त्याचे नातेवाईक जखमी आहे. फिर्यादीचे पिकप चे धडक लागल्याने वाहनाचे समोरील अंदाजे चार लाख रुपयाचे नुकसान झाले अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.सदर घटनेची माहिती मिळताच ठाणेदार श्री केशव ठाकरे यांनी तात्काळ पोलीस जमादार सतीश चौधार ,अशोक टेकाळे, समीर बन, पोलिस अंमलदार अमोल कानेकर यांना घटनेच्या ठिकाणी पाठवून त्या ठिकाणी रस्ता रहदारी सुरळीत केली पुढील तपास माननीय ठाणेदार साहेब यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...