⚡ ब्रेकिंग News

महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज सादर करण्याचे आवाहन

महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज सादर करण्याचे आवाहन यवतमाळ, दि. 24 : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीच्या विविध योजना राबविण्यात येते. महाविद्यालयांनी त्यांच्यास्तरावर प्रलंबित ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रदाने, राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती इत्यादी योजना राबविण्यात येतात. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील या योजनांचे प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी पोर्टल सुरु करण्यात आले आहे. दि. 17 सप्टेंबरच्या डॅशबोर्डनुसार विद्यार्थ्यांनी 10 हजार 354 अर्जाची नोंदणी केली असून महाविद्यालयाने केवळ 8 हजार 673 अर्ज मंजुर केलेले आहे. महाविद्यालयस्तरावर 550 अर्ज प्रलंबित आहे. जिल्ह्यात गुलाम नबी आझाद कॉलेज ऑफ सोशल वर्क पुसद, विद्यानिकेतन महिला महाविद्यालय यवतमाळ, शिवाजी हायस्कूल यवतमाळ, कस्तुरबा गांधी कन्या विद्यालय उमरखेड, राजकुंवर महिला महाविद्यालय वणी, के.जी. वाघ महिला महाविद्याल कळंब, श्री विनायकबापू देशमुख नर्सिंग स्कूल सावरगाव, श्री विनायकबापू देशमुख नर्सिंग स्कूल यवतमाळ, श्री साईबाबा विद्यालय टेभी, महागाव, महाजन नर्सिंग स्कूल, यवतमाळ या शाळांकडे एकून 550 शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडुन शिष्यवृत्तीचे अर्ज भरुन घ्यावे व पात्र विद्यार्थ्यांचे परिपुर्ण अर्ज मुळटीसीसह मंजुरीसाठी विहीत मुदतीत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे ऑनलाईन सादर करावे. भविष्यात प्रलंबित अर्ज ॲटो रिजेक्ट झाल्यास व पात्र विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील. अपात्र अर्ज विद्यार्थी लॉगिनला परत करण्यात यावे. पात्र विद्यार्थ्यांकडुन शुल्क घेण्यात येवू नये, असे समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...