अखिल भारतीय बंजारा महिला सरचिटणीस पदी रंजना आडे यांची नियुक्ती
आर्णी गणेश एकंडवार
आर्णी:येथील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या आर्णी नगर सुधार समीती च्या कार्याध्यक्षा रंजना ताई आडे यांची अखिल भारतीय बंजारा संयुक्त कार्यवाही महिला कमीटी सरचिटणीस पदी नुकतीच निवड करण्यात आली. महीला कमिटी च्या राष्ट्रीय अध्यक्ष सौ. पार्वती ताई फुलसिंग यांच्या अध्यक्षतेखाली रंजना आडे यांची नियुक्ती करण्यात आली. थोडसं जगण समाजासाठी या युक्ती नुसार आपण समाजासाठी कार्य करू असे आडे यांनी यावेळी मत व्यक्त केले. या निवडी ने रंजना यांच्यावर अभिनंदन चा वर्षाव होत आहे.
अखिल भारतीय बंजारा महिला सरचिटणीस पदी रंजना आडे यांची नियुक्ती
Bhagirath Raja 24 News.com
0


إرسال تعليق