खंडाळा येथे संत सेवालाल महाराज मंदिर भूमिपूजन उत्साहात संपन्न
नीताताई राजेश आडे यांच्या हस्ते संपन्न झाला
भगीरथ राजा 24 न्यूज नेटवर्क
मुख्य संपादक गणेश एकंडवार
१४ फेब्रुवारी रोजी आर्णी तालुक्यातील खंडाळा येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या शुभमुहूर्तावर मंदिर बांधकामासाठी विधीपूर्वक भूमिपूजन सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. या पवित्र कार्याचा शुभारंभ नीताताई राजेश आडे यांच्या हस्ते करण्यात आला. पारंपरिक मंत्रोच्चार, पूजा-अर्चा व धार्मिक विधींच्या साक्षीने मंदिर उभारणीच्या कार्यास अधिकृत प्रारंभ झाला.कार्यक्रमास खंडाळा व परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
महिलावर्ग, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भक्तिभावाने दर्शन व पूजन केले. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. मंदिर उभारणीमुळे गावात धार्मिकतेसोबतच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत सेवालाल महाराज यांच्या विचारांचा समाजजीवनावर होणारा सकारात्मक प्रभाव अधोरेखित केला. एकता, सेवा, संस्कार आणि सामाजिक सलोखा जपण्याची प्रेरणा त्यांच्या विचारांतून मिळते.
मंदिराच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य अधिक दृढ होईल तसेच तरुण पिढीमध्ये सद्गुणांची रुजवण होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.दरम्यान, १५ फेब्रुवारी रोजी सेवालाल महाराज जयंतीच्या निमित्ताने नीताताई राजेश आडे व राजेश आडे (कामगार उपायुक्त, मुंबई) यांनी परिसरातील विविध ठिकाणी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. समाजात सलोखा, बंधुता व सामाजिक जाणीव वाढविण्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला. या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.



إرسال تعليق