नारायणलीला इंग्लिश मीडियम स्कूलच्या बालकलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम

 नारायणलीला इंग्लिश मीडियम स्कूलच्या बालकलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम

आर्णी:येथीलनारायणलीला इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये काल दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ ला सायंकाळी 'नारायणलीला सांझ' हा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय लोककला संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या कार्यक्रमात शाळेच्या बालकलाकारांनी पारंपारिक लोक-नृत्य, लोक-संगीत आणि एकांकिकेचे उत्कृष्ट सादरीकरण केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक प्रमोदजी बुब सर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार नौशाद अली सर आणि युवा पत्रकार इमरान बेग सर हे होते.
सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे व इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन,फोटो पूजन झाले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम झालेल्या लहान-लहान मुलाच्या पदलालित्यांनी रसिकांचे मनं मोहून घेतली. त्या नंतर एका मागून एक अशा सरस नृत्यांच्या व एकांकिकांच्या सादरीकरणाला सुरुवात झाली. यामध्ये भारतातील वेगवेगळ्या भाषांवर आधारित लोकनृत्य सादर करण्यात आले. एकांकिकेने प्रेक्षकांची मने जिंकले.
या कार्यक्रमाला शाळेचे कार्यवाहक प्रकाश ठाकरे सर, प्राचार्य भाग्यश्री निवल मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर शाळेचे प्रत्येक शिक्षक-शिक्षिका हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाम शेख सर यांच्या मार्गदर्शनात नवव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी केले, तर आभार प्रदर्शन अशोक सकवान सर यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...