जवळा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 जवळा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी



आर्णी तालुका प्रतिनिधी : गणेश एकंडवार

जवळा येथील ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात जवळा बसस्टॉप परिसरातील मारुती मंदिर येथे शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कामगार उपायुक्त, मुंबई श्री. राजेश आडे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. तसेच गावातील शिवभक्त व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पाण्याच्या टाकीजवळील शिवाजी महाराजांच्या फलकास तसेच वार्ड क्रमांक एकमधील शिवाजी महाराज चौकातील प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


दरम्यान, म्हसोला येथे कान्होबा होळी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराच्या सुरक्षेसाठी कामगार उपायुक्त राजेश आडे यांनी सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून दिल्याची माहिती देण्यात आली. तसेच गनगाव येथे शिवाजी महाराजांच्या फ्लेक्स बोर्डचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.संपूर्ण गावात शिवजयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण असून “जय भवानी, जय शिवाजी” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजयंती उत्सव समिती व श्रीराम उत्सव समिती, जवळा यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...