जीवघेणी जिर्ण ईमारत त्वरीत पाडण्याची नागरिकांची मागणी
लेखी तक्रार देवून सुद्धा नगर परिषदचे दुर्लक्ष
आर्णी: शहरातील प्रभाग क्र.९ जुनी वस्ती श्री गजानन महाराज मंदिराचे समोर स्व. बाळकृष्ण निलावार ह्यांची जिर्ण ईमारत कधीही पडण्याच्या स्थितीत असून जिर्ण ईमारतीला लागुणच रहदारीचा रस्ता आहे. सदर ईमारत जिर्ण अवस्थेत असून कधीही दुर्देवी घटना होण्याची शक्यता आहे.
ईमारतीमध्ये गेल्या २०-२५ वर्षापासुन कोणीही राहत नसल्यामुळे भटके कुत्रे, मोकाट मोकाट जनावरेव विद्यु काटा अशा अनेक गोष्टीचा त्रास येथील नागरिकांना होत आहे. त्यातच टीनपत्रावर स्लॅब टाकलेला असल्यामुळे तो कधी कोसळु शकतो व भवीष्यात जिवीत हाणी होऊ शकते.
यापुर्वी दिनांक १७/०२/२०२३ ला सुध्दा श्री राजेंद्र शिवरामवार यांनी लेखी तक्रार केलेली होती परंतु आतापर्यंत न. प कोणतीही दखल घेतली नाही तरी मुख्याधिकारी नगर परिषद, आर्णी यांनी याबाबत सुचना घेऊन त्वरीत कार्यवाही करावी व भविष्यात होणारी जिवीतहाणी टाळावी अशी येथील रहिवासी नागरिकांनी न. प आर्णीला निवेदनात मागणी केली आहे.
जीवघेणी जिर्ण ईमारत त्वरीत पाडण्याची नागरिकांची मागणी
Bhagirath Raja 24 News.com
0

إرسال تعليق