आर्णी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न

 आर्णी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न




आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार 


आर्णी, दि. 20 एप्रिल 2026 – भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीणच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांवर आधारित प्रशिक्षण कार्यशाळा आर्णी येथील रेणुका मंगल कार्यालयात उत्साहात पार पडली. सकाळी 10 ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यशाळेला पदाधिकारी, बुथ प्रमुख व शक्ती प्रमुखांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किसन राठोड यांनी केले. कार्यशाळेचे उद्घाटन आमदार राजूभाऊ तोडसाम यांच्या हस्ते झाले. यावेळी शंतनू शेटे, राजू पडगिलवार (महामंत्री), प्रियाताई तोडसाम, प्रकाश राठोड, निखिल ब्राह्मणकर, चैताली देशमुख यांच्यासह गजाननजी भोतेकर, प्रफुल्लजी चव्हाण, मयाताई शेरे, रेखाताई कोटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यशाळेत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. सोशल मीडिया, ॲप्सचा वापर, पक्षाची कार्यपद्धती, बुथ व्यवस्थापन, कार्यविस्ताराची दृष्टी तसेच आपल्या सरकारची कामगिरी व अंमलबजावणी या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. श्री. शंतनूजी शेटे, श्री. राजूभाऊ पडगिलवार, मयाताई शेरे, गजाननजी भोतेकर, प्रफुल्लजी चव्हाण, कितीताई राजत व रेखाताई कोटेकर यांनी मार्गदर्शन केले.


समारोप प्रफुल्लजी चव्हाण (जिल्हाध्यक्ष, जि.प. यवतमाळ) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. वक्त्यांनी कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.

या प्रशिक्षण कार्यशाळेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...