⚡ ब्रेकिंग News

वणी विधानसभा मतदार संघावर काँग्रेसचा दावा खासदार प्रतिभाताई धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांनी घेतली प्रदेशाध्यक्षाची भेट !

वणी विधानसभा मतदार संघावर काँग्रेसचा दावा खासदार प्रतिभाताई धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांनी घेतली प्रदेशाध्यक्षाची भेट !
वणी महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या निवडणुकी करिता उमेदवारा जवळ केवळ तीन महिन्याचा कालावधी उरलेला आहे. त्यामुळे वणी विधानसभा मतदार संघातील सर्वच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले असल्याचे दिसून येते. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना आमदार पदाचे स्वप्न पडू लागले आहे. परंतु महाविकास आघाडीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) शिवसेना पक्ष (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे असल्यामुळे युतीतील सर्वच नेत्यांना वाटते की वणी विधानसभा मतदार संघाची तिकीट आपल्याच पक्षाला मिळणार ? सदर वणी विधानसभा मतदार संघाची तिकीट शिवसेना (उबाठा पक्षाला) मिळणार असल्याची चर्चा आहे. त्या पद्धतीने त्यांनी मतदार संघातही कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे उबाठा पक्षाचे पदाधिकारी सध्या तरी कामाला लागल्यामुळे काँग्रेस पक्षात अस्वस्थता व नाराजी पसरली असल्याचे दिसून येते. शिवसेना ( उबाठा पक्षाच्या) वाट्याला तिकीट गेली तर आपले कसे होणार अशी भीती देखील काँग्रेस गटात वाटत असल्याचे दिसून येते. प्रत्येक पक्षाचे पदाधिकाऱ्यांना आपल्याला तिकीट मिळेल अशी आशा घेऊन कामे करून समाजात वावरत आहे. त्यामुळे महा विकास आघाडी मधून काँग्रेस पक्षाला तिकीट मिळावी यासाठी नुकतीच वणी विधानसभा मतदार संघाचे कार्यकर्त्यांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर व माजी आमदार वामनरावजी कासावार यांचे नेतृत्वात ८ जुलै रोजी मुंबई येथे जाऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. वणी तालुका काँग्रेस कमिटीच्या शिष्ट मंडळांनी सदर भेट ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मुंबई येथे घेतली. त्यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर व वणी विधानसभा मतदार संघाचे चार वेळा प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार वामनराव कासावार यांनी वणी विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला असून विरोधी पक्षाचे मोजकेच टर्म सोडले तर वणी विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहे हे पटवून दिले.
त्याशिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना वणी विधानसभा मतदार संघातून तब्बल 58000 ची लीड मिळाली आहे. सध्या तरी राज्यात तसेच वणी विधानसभा मतदार संघात काँग्रेसमय वातावरण असल्यामुळे वणी विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचा आमदार निवडून येऊ शकतो असेही सांगितले. त्याशिवाय मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असताना सुद्धा काँग्रेसच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून वणी विधानसभा मतदार संघाची सीट मित्र पक्षाच्या वाट्याला न देता काँग्रेसला देण्यात यावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करण्यात आली.
त्यावेळी शिष्टमंडळाने दिलेल्या अर्जावर वणी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष घनश्याम पावडे, मारेगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारोती गौरकार, काँग्रेसचे झरी तालुका अध्यक्ष आशिष खुडसंगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मुंबई येथे हजर झालेल्या शिष्टमंडळामध्ये खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार, संजय खाडे, पवन एकरे, पुरुषोत्तम आवारी, तेजराज बोढे, आशिष खुलसंगे, घनश्याम पावडे, टीकाराम कोंगरे, प्रशांत गोहोकार, इत्यादी हजर होते. माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात काँग्रेस एकजूट असून काँग्रेस तर्फे नेहमी जनतेच्या प्रश्नावर शासन दरबारी आंदोलन छेडण्यात आलेले आहे. काँग्रेसचे उभरते नेतृत्व म्हणून बहुतांश आंदोलनामध्ये युवा नेते संजयजी खाडे यांचा सिंहांचा वाटा असतो. त्यामुळे संजय खाडे हे त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी केलेल्या कामामुळे वणी विधानसभा मतदार संघात क्रियाशील व्यक्तिमत्व म्हणून पुढे येताना दिसत आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...