कधी मिळणार.! चिमुकल्यांना स्वच्छ अंगणवाडी शाळा

कधी मिळणार.! चिमुकल्यांना स्वच्छ अंगणवाडी शाळा
चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात? बाल कल्याण अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आर्णी तालुक्यातील तसेच शहरातील अनेक अंगणवाडी शाळेवर पत्रे नाही तर काही शाळेत घाण असून अस्वच्छ आहेत त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. अंगणवाडी हा देशातील ग्रामीण बाल संगोपन केंद्राचा एक प्रकार आहे. बालकांची भूक आणि - कुपोषणाचा सामना करण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा कार्यक्रमाचा भाग म्हणून भारत सरकारने १९७५ मध्ये याची सुरुवात केली होती. अंगणवाडीचा अर्थ 'अंगण निवारा' असा होतो. नावाप्रमाणेच अंगणवाडी हे एक केंद्र आहे. अंगणवाडी केंद्र पगारदार अंगणवाडी सेविका चालवितात. आणि अंगणवाडी मदतनीस त्यांना मदत करतात. अंगणवाडी केंद्र स्थापन करण्यासाठी सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे लोकसंख्येच्या निकषावर आधारित आहेत. ह्यात महिला आणि बालकांच्या सर्वागीण विकासावर अधिक भर दिला जातो. ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना पूर्व माध्यमिक शिक्षण देणे तसेच माता, पालक यांच्या आरोग्य, आहार, कुपोषण या अन्य बाबीकडे लक्ष पुरवणे अशा कार्याच्या समावेश अंगणवाडीमध्ये होतो. ह्याशिवाय पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, ग्रामीण भागातील महिलांना आहार व आरोग्य याविषयी योग्य मार्गदर्शन करणे हे देखील अंगणवाडीचे मूलभूत कार्य आहे. या मूलभूत बाबीकडे बाल कल्याण अधिकारी यांनी लक्ष देऊन त्या चिमुकल्यांना स्वच्छ व दुरुस्त अंगणवाडी ची व्यवस्था करण्याची गरज आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...