वंचितच्या तक्रारीवरून हल्दीरामचा परवाना निलंबित*

*वंचितच्या तक्रारीवरून हल्दीरामचा परवाना निलंबित* *वंचित बहुजन आघाडीची तक्रार.. हल्दीरामचा परवाना निलंबित*
*अखेर हल्दीरामला वंचित चा दणका* *अखेर हल्दीरामचा परवाना रद्द.*. शहरातील हल्दीराम ( ओम इंडस्ट्रीज ईंडीया प्रा. लि.) ह्या नामांकीत शोरूम मधे बूरशी यूक्त मिठाई विक्री करण्यात येत असल्याचे प्रकरण समोर आले होते .पाऊस व रोगराईचे थैमान सूरू असतांना बूरशीयूक्त मिठाईची विक्री करून खाद्यपदार्थातील विषबाधेने नागरीकांना मरणाच्या दारात लोटण्याचे कार्य हल्दीराम सारख्या नामांकीत शोरूम मधून होत असल्याने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांनी *बूरशीयूक्त मिठाई सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन याना वंचीत बहुजन आघाडी कडून कडून भेट स्वरूपात देऊन आपला निषेध नोंदवला होता. व दिनांक ६ ऑगस्टला तक्रार दाखल केली होती.* या प्रकारामुळे शहरातील सर्वसामान्य नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून हल्दीराम दूकानाचा परवाना रद्द करावा अशी मागणी केली होती . *वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे चौकशी करण्यात आली.* आणि चौकशीअंती हल्दीराम प्रतिष्ठानला दोषी ठरवून आज दि. ३०/८/२०२४ ला *अन्न सुरक्षा व मानद कायदा 2006* नुसार सहाय्यक आयुक्त(अन्न) तथा पद निर्देशन अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, यवतमाळ यांनी हल्दीराम या नामांकित ब्रँडचा परवाना 3 सप्टेंबर पासून निलंबित केला असल्याचे आदेश संबंधितांना निर्गमित करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या डॉ.नीरज वाघमारे यांनी या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन तक्रार नोंदवल्यामुळे शेकडो सर्वसामान्य नागरिकांच्या जिवितास होणारा धोका टळल्यामुळे परिसरात सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...