⚡ ब्रेकिंग News

कुमार चिंता यवतमाळ चे नवीन अधीक्षक तर नवी मुंबई येथे समादेशक म्हणून नुरूल हसन

कुमार चिंता यवतमाळ चे नवीन अधीक्षक तर नवी मुंबई येथे समादेशक म्हणून नुरूल हसन
गणेश एकंडवार यवतमाळ : राज्याच्या गृह विभागाने भापोसे, रापोसे अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यात २९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यवतमाळ येथे पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोली येथील अपर पोलीस अधीक्षक राहिलेले कुमार चिंता हे येणार आहेत. यवतमाळचे पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोडे यांची बदली अमरावती येथे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक म्हणून झाली आहे. वर्धा येथील पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांची समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ११ नवी मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे. पोलिस महासंचालकांनी कायदा व सुव्यवस्था निवडणुकीची आदर्श आचारंहिता अशा बाबी लक्षात घेवून कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने त्यांच्या आदेशातून स्पष्ट केले आहे. दरम्यान, पंकज शिरसाट (पोलिस उपायुक्त, ठाणे शहर), अतुल झेंडे (पोलिस उपायुक्त, ठाणे शहर), रूपाली खैरमोडे (पोलि अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे), विनायक नरळे (अपर पोलिस अधीक्षक, पालघर), अभिजीत शिवथरे (अपर पोलिस अधीक्षक, रायगड), राहुल माकणीकर (पोलिस उपायुक्त, नागपूर), लक्ष्मीकांत पाटील (पोलिस अधीक्षक, सायबर सुरक्षा, मुंबई), विजयकांत सागर (पोलिस उपायुक्त, बृहन्मुंबई), वैशाली कडूकर (अपर पोलिस अधीक्षक सातारा), दिपाली धाटे (पोलिस उपायुक्त, बृहन्मुंबई), सुरज गुरव (अपर पोलिस अधीक्षक, नांदेड) यांच्याही बदल्या झाल्या आहेत.
▪️बदली झालेले अधिकारी अतुल कुलकर्णी : सोलापूर पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे : हिंगोली पोलिस अधीक्षक सुधाकर पठारे : सातारा पोलिस अधीक्षक अनुराग जैन : वर्धा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे : बुलढाणा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे : पुणे पोलिस अधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) संजय वाय. जाधव : उस्मानाबाद पोलिस अधीक्षक कुमार चिंता : यवतमाळ पोलिस अधीक्षक आंचल दलाल : राज्य राखीव पोलिस बल गट क्र. एक समादेशक (पुणे) नंदकुमार ठाकूर : प्राचार्य, पोलिस प्रशिक्षक केंद्र, दौंड निलेश तांबे : प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर पवन बनसोडे : पोलिस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती नुरूल हसन : समादेशक, राज्य राखीव पोलिस बल गट क्र. ११, नवी मुंबई समीर शेख : पोलिस उपायुक्त, मुंबई शहर अमोल तांबे : पोलिस अधीक्षक, दक्षता अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मनिष कलवानिया : पोलिस उपायुक्त, मुंबई शहर अपर्णा गिते : कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मुंबई दिगंबर प्रधान : पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...