⚡ ब्रेकिंग News

अण्णाभाऊ साठे महामंडळ ईश्वर चिठ्ठीने लाभार्थी निवडणार

अण्णाभाऊ साठे महामंडळ ईश्वर चिठ्ठीने लाभार्थी निवडणार
यवतमाळ, दि.27 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्यावतीने विविध कर्ज प्रकरणांसाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात आले होते. अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची निवड दि.4 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे ईश्वर चिठ्ठीद्वारे करण्यात येणार आहे.
जिल्हा कार्यालयाच्यावतीने एनएसएफडीसी सुविधा कर्ज रुपये ५ लाख पर्यंत व महिला समृध्दी कर्ज योजना १ लाख ४० हजार पर्यंत कर्ज मिळण्याकरिता ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यात आले होते. कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यालयात दाखल केलेल्या लाभार्थ्यांची निवड लॉटरी पध्दतीने दि.4 ऑक्टोबर रोजी वेळ दुपारी १२ वाजता बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे केले जाणार आहे. सदर निवड निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील मातंग, मांग, मांग-गारोडी, मादगी व मादिगा समाजातील कर्ज प्रकरण दाखल केलेल्या लाभार्थ्यांनी दि.4 ऑक्टोबर रोजी वेळ सकाळी ११.३० वाजता पर्यंत बचत भवन येथे उपस्थित राहावे. तत्पूर्वी महामंडळाच्या कार्यालयात स्वत: संपर्क साधून आपले कर्ज प्रकरण यादीमध्ये समाविष्ट असल्याची खात्री करुन घ्यावी, महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी कळविले आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...