गृहरक्षक जवानाच्या कर्तव्यदक्षतेला पोलीस अधीक्षकांचे प्रशंसापत्र*

 *गृहरक्षक जवानाच्या कर्तव्यदक्षतेला पोलीस अधीक्षकांचे प्रशंसापत्र*



प्रतिनिधी गणेश एकंडवार

दि. १५ : यवतमाळ जिल्हा गृहरक्षक दलात कार्यरत स.क्र. १०७६ वसंता रामभाऊ राऊत यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक कुमार चिंता, भा.पो.से. यांनी त्यांना प्रशंसापत्र देऊन गौरविले आहे.


पोलीस स्टेशन नेर येथे बंदोबस्त कर्तव्यावर असताना राऊत यांनी गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस स्टेशन नेर अंतर्गत अपराध क्र. २६६/२०२६, कलम १०३(१) भारतीय न्याय संहिता-२०२३ नुसार दाखल गुन्ह्यातील आरोपी मिळून येत नसताना, राऊत यांनी आजूबाजूच्या परिसरात व शेतामध्ये शिताफीने शोध घेऊन आरोपीचा ठावठिकाणा लावला.


त्यांच्या तत्परतेमुळे आरोपीस तात्काळ अटक करणे शक्य झाले.प्रशंसापत्रात पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे की, "आपण केलेली कामगिरी खरोखरच उल्लेखनीय व प्रशंसनीय आहे. भविष्यातही अशीच कामगिरी करून जिल्हा गृहरक्षक दलाची प्रतिमा उज्वल कराल, ही अपेक्षा." गेल्या अनेक वर्षांपासून राऊत हे प्रामाणिकपणे गृहरक्षक दलात सेवा देत आहेत. त्यांच्या या धाडसामुळे नेर परिसरात गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला आहे. या सन्मानामुळे गृहरक्षक दलातील इतर जवानांचाही उत्साह वाढला आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...