⚡ ब्रेकिंग News

जागतिक हृदय दिन साजरा

जागतिक हृदय दिन साजरा
मानवी शरीरातील हृदय हा फार महत्त्वाचा अवयव असून त्याची योग्य ती काळजी आपण घेतली पाहिजे अशी प्रतिपादन केंद्रप्रमुख गजानन शेलुकार यानी राष्ट्रीय सेवा योजनेच्या आयोजित कार्यक्रमात केले दिनांक 29 सप्टेंबर 2024 रविवारी जागतिक हृदय दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन स्व. भारत सिंह ठाकूर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जवळा चे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी सेवक गोविंदा भाऊ भिसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. काजळे उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना माहिती देताना आपल्या भाषणामध्ये केंद्रप्रमुख गजानन शेलूकार यांनी आरोग्य विषयक बाबीचे महत्त्व विशद केले. सोबतच आरोग्यविषयक सवयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. आणिस सोलंकी यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. पुरुषोत्तम ठाकरे यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. विलास राऊत यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजना द्वारे करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थी आणि प्राध्यापकांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी प्रा. ज्योतिपाल देशपांडे प्रा.मीनाक्षी लोखंडे यांनी विशेष प्रयत्न केले

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...