पालकमंत्र्याच्या वाहनाच्या अपघातात पिकअप वाहन चालकाचा मृत्यू
यवतमाळ : 4 ऑक्टोबर च्या मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाने समोर असलेल्या पिकअप वाहनाला भीषण अपघात झाला या अपघातातच पिकअप वाहन चालकाचा मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात चांगलीच रंगलेली आहे. यासंदर्भात आर्णी पोलिसांची संपर्क केला असता अशी कुठलीही घटना घडली नसल्याचे सांगितल्या जात असून या अपघातात अद्याप कोणीही फिर्याद नोंदवली नसल्याचे आर्णी पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र मंत्र्याच्या वाहनाने पिकअप वाहनाला इतकी भीषण धडक दिली की मंत्र्याच्या वाहनासह त्या पिकअप वाहनाचा अक्षरश: चुराडा झाला होता इतका भीषण अपघात झाल्यानंतरही या घटनेत फिर्याद नोंदवल्या गेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पिकअप वाहन चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची चर्चा सध्या परिसरात रंगली असून फिर्याद देण्यासाठी कोणीही पुढे आला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघातातील दोन्ही वाहने पोलिसांकडून जप्त करण्यात आली नसून अत्यंत चक्काचुर झालेल्या वाहनाचे नेमके झाले तरी काय या भीषण अपघातामध्ये अद्यापही फिर्याद नोंदविण्यात आली नाही.यामागील कारण काय हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.विशेष म्हणजे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाचा अपघात झाल्याच्या बातम्या सर्वच वर्तमानपत्र तसेच वृत्तवाहिन्यांवरून प्रसिद्ध झाल्या यानंतर खुद्द पालकमंत्र्यांनी सकाळी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन अपघात झाल्याची पुष्टी केली. मात्र त्या वाहनांमध्ये मी प्रवास करत नव्हतो,हेही सांगितले पण पालकमंत्र्याचे वाहन नेमके कोण चालवत होते,त्या वाहनात किती जण प्रवास करत होते.तसेच ज्या वाहनाला जबर धडक दिली. त्या वाहनांमध्ये एकूण किती जण होते व वाहन चालकाचे नाव काय हे सर्व गुलदस्त्यातच आहे.यामुळे परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलेले आहे.
पालकमंत्र्याच्या वाहनाच्या अपघातात पिकअप वाहन चालकाचा मृत्यू
Bhagirath Raja 24 News.com
0

إرسال تعليق