शिरपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे आयोजन

 शिरपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे आयोजन


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिरपूर, ता. आर्णी, जि. यवतमाळ येथे भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त शिरपूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले असून विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व समाजप्रबोधनपर उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे.


दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत प्रश्नमंजुषा स्पर्धा, तर रात्री ७ ते ८.३० या वेळेत भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना आकर्षक व प्रोत्साहनात्मक बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यानंतर रात्री ८.३० ते १० या वेळेत नागपूर येथील अ‍ॅड. डॉ. रमेश राठोड यांचे व्याख्यान होणार असून “श्री संत सेवालाल यांची पंचशील विचारधारा” या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत.


दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत भव्य जयंती मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री ८.३० ते ११ या वेळेत सुप्रसिद्ध संमोहनतज्ञ नवनाथ गायकरवाड यांचा संमोहन कार्यक्रम व हिप्नोटिझम शो आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधनाचा संदेश दिला जाणार आहे.या दोन दिवसीय महोत्सवासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...