⚡ ब्रेकिंग News

आज उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कारांचे वितरण यवतमाळातील जय विजय गणेशोत्सव मंडळाला पुरस्कार जाहीर

आज उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कारांचे वितरण यवतमाळातील जय विजय गणेशोत्सव मंडळाला पुरस्कार जाहीर यवतमाळ, दि.८ : सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु.ल.देशपांडे कला अकादमीच्यावतीने घेण्यात आलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे निकाल घोषित करण्यात आले आहे. यवतमाळ येथील जय विजय गणेशोत्सव मंडळाला पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्या दि.९ आँक्टोंबर रोजी मुंबई येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे. जिल्हास्तरीय पुरस्कार घोषित मंडळाला 25 हजार रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पुरस्काराचे वितरण सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते बुधवार दि.९ ऑक्टोबर रोजी यशवंत नाट्यमंदिर, माहीम, मुंबई येथे दुपारी १२ वाजता होणार आहे. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खा.अनिल देसाई, आ.सदा सरवणकर उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाने केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...