*मुक्ताईनगर येथे ऑल इंडिया पँथर सेनेतर्फे आरक्षण बचाव मोर्चा संपन्न*
*जळगाव (हिंदुसम्राट प्रतिनिधी किरण पाटील यांजकडून) मुक्ताईनगर येथे ऑल इंडिया पॅंथर सेने तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ केदार यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष लखन पानपाटील व संपूर्ण तालुका जिल्हा पदाधिकारी व संपूर्ण समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला .या मोर्चाला रेस्ट हाऊस पासून सुरुवात झाली हा मोर्चा प्रवर्तन चौकात आल्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला
नंतर हा मोर्चा तहसील कार्यालयात नेण्यात आला यावेळी वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या .यावेळी तहसीलदार यांना वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी पुढील मागण्या करण्यात आल्या अनुसूचित जातींमधील आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे, रखडलेले पदोन्नतीतील आरक्षण त्वरित लागू करावे, ईव्हीएम यंत्रणा हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्या, बुद्धगया महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे ,शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येस जबाबदार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी,
राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करावी यासारख्या अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या .याप्रसंगी या मोर्चात ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते .अशा प्रकारे मुक्ताईनगर येथे ऑल इंडिया पँथर सेनेतर्फे आरक्षण बचाव मोर्चा संपन्न झाला.



إرسال تعليق