⚡ ब्रेकिंग News

आर्णी येथे आ. प्रा. राजूभाऊ तोडसाम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न

 आर्णी येथे आ. प्रा. राजूभाऊ तोडसाम यांच्या  भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न




आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार 

आर्णी : राजूभाऊ तोडसाम (आर्णी विधानसभा मतदारसंघ) यांच्या वाढदिवसानिमित्त आर्णी तालुक्यात भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिर माहेर मंगल कार्यालय, आर्णी येथे उत्साहात पार पडले.

या महाआरोग्य शिबिरात एकूण ७५२ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. त्यापैकी २२६ रुग्णांना पुढील विशेष उपचारासाठी सावंगी मेघे येथे पाठविण्यात येणार आहे. तसेच सुमारे २६ रुग्णांची ईसीजी तपासणी करण्यात आली.



हे शिबिर आचार्य विनोबा भावे रुग्णालय, सावंगी मेघे यांच्या सहकार्याने तसेच राजूभाऊ तोडसाम मित्रपरिवार, आर्णी यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आले होते.


कार्यक्रमाला आमदार राजूभाऊ तोडसाम यांच्यासह सावंगी मेघे येथील रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी एन. पी. शिंगणे, सौ. प्रिया तोडसाम, सौ. नीता राजेश आडे, राजेश आडे, प्रकाश राठोड, किसन राठोड, अनंता गावंडे, विलास राऊत, डॉ. श्याम गुठे, डॉ. रमेश व्यवहारे, डॉ. स्वप्निल सत्तुरवार, विशाल देशमुख, मंगेश वानखडे, निखिल ब्राह्मणकर, गोपाल शर्मा, सचिन आडे, विनोद राठोड, प्रा. गोपने सर, प्रा. मेश्राम सर, अमोल चिल्लरवार, बादल चव्हाण, महेश काळबांडे, अमोल ठाकरे, किसन लडके, उमेश राठोड, राम आगीरकर, विश्वजीत मस्के, शिवाजी भालेवाड, बबलू तिवारी, सचिन आडे,कल्पजीत देवकर, मंगेश सोयाम, राणा कुरसंगे, मोहन आगीरकर, सुनील पूसनाके, संजय राठोड, वैभव कुडमते आदी उपस्थित होते.



या शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत व तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. आयोजकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...