दिव्यांगाना आता ₹2500 मासिक अर्थसहाय्य  दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआयडी प्रमाणपत्र सादर करावे  तहसिलदार डॉ. योगेश देशमुख यांचे आवाहन

 दिव्यांगाना आता ₹2500 मासिक अर्थसहाय्य

 दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआयडी प्रमाणपत्र सादर करावे

 तहसिलदार डॉ. योगेश देशमुख यांचे आवाहन


तहसिल कार्यालय यवतमाळ अंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्यात राज्य शासनाने १ हजार रुपयांची वाढ केली असून फक्त दिव्यांग लाभार्थ्यांना आता प्रत्येक महिन्याला एकूण 2500 रुपये मासिक अर्थसहाय्य अथवा अनुदान डिबीटीद्वारे आधार लिंक असलेल्या बँक खात्यात नियमित वितरीत केले जात आहे.


या योजनांचा लाभ नियमित व सुरळीत सुरु ठेवण्यासाठी वैश्विक दिव्यांग (युडीआयडी) प्रमाणपत्र किंवा वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (युडीआयडी कार्ड ) आधार सोबत लिंक करून वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्राची व आधार कार्डची छायांकित प्रत मोबाईल नंबरसह या कार्यालयात सादर करावी. तसेच ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे ऑफलाईन पद्धतीचे दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्यांनी येत्या आठ दिवसात वैश्विक (युडीआयडी ) दिव्यांग प्रमाणपत्र काढून घ्यावे व ज्या दिव्यांग लाभार्थ्यांनी अद्याप वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेले नाही


त्यांनी त्वरित या प्रमाणपत्राची व आधार कार्डची छायांकित प्रत मोबाईल नंबरसह या कार्यालयात सादर करावी, असे आवाहन यवतमाळचे तहसिलदार डॉ. योगेश देशमुख व नायब तहसिलदार राजेश चिंचोरे यांनी केले आहे. सदर दिव्यांग लाभार्थ्यांचे वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्र आधार कार्ड सोबत संलग्न करण्याकरिता जवळच्या सेतू अथवा सीएससी केंद्रामध्ये जावून आधार संलग्नीकरण करून घेण्यात यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...