यवतमाळ तालुक्यातील केरोसीन परवाना नूतनीकरणाबाबत सूचना

 यवतमाळ तालुक्यातील केरोसीन परवाना नूतनीकरणाबाबत सूचना


 सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एलपीजीचा पर्याय म्हणून केंद्र शासनाने 12 मार्च रोजीच्या आदेशानुसार राज्याला 3744 किलोलीटर केरोसीनचे नियतन मंजूर केले आहे. यवतमाळ तालुक्यातील सर्व किरकोळ, होलसेल व सेमी होलसेल परवाना धारकांनी आपले केरोसीन परवाने तात्काळ नूतनीकरणासाठी तहसील कार्यालयात सादर करण्याची आवाहन तहसीलदार डॉ योगेश देशमुख यांनी केले आहे. 



यापूर्वी नूतनीकरणासाठी अर्ज केले असल्यास त्याची पोच देखील जमा करणे आवश्यक आहे. ज्या परवाना धारकांना केरोसीन वाटपात सहभागी व्हायचे नसेल त्यांनी तसे लेखी स्वरूपात तत्काळ कळवावे. तसेच मूळ परवाना धारकाचा मृत्यू झाल्यास वारसाहक्काने परवाना वर्ग करण्यासाठी प्रस्ताव सादर करावे. प्रक्रिया कालमर्यादित असल्याने उशिरा प्राप्त होणाऱ्या अर्जांवर नूतनीकरण किंवा वारस प्रक्रिया संदर्भात कोणताही विचार केला जाणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.असे यवतमाळचे तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांनी कळविले आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...