यवतमाळ l अधिकारी, कर्मचाऱ्यांना डिजिटल जनगणनेचे प्रशिक्षण २३ ते २५ मार्च दरम्यान प्रशिक्षण कार्यक्रम

 यवतमाळ l अधिकारी, कर्मचाऱ्यांना डिजिटल जनगणनेचे प्रशिक्षण

२३ ते २५ मार्च दरम्यान प्रशिक्षण कार्यक्रम


 जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनगणना प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना डिजिटल जनगणनेचे प्रशिक्षण देण्यासाठी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या प्रशिक्षणाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, प्रशिक्षक म्हणून जनगणना संचालनालयाचे सह संचालक व्हि. एस दिक्षीत, सांख्यिकीचे मयुर पवार उपस्थित होते.


या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात पहिल्या टप्प्यातील डिजिटल घरगणनासंदर्भात जिल्हास्तरावरील सर्व अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...