प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक अशपाक शेख यांची सेवाभावी कार्यशैली चर्चेत
प्रभाग क्रमांक ५ मधील नगरसेवक अशपाक शेख हे आपल्या वेगळ्या आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. दररोज सकाळी लवकर उठून ते स्वतः प्रभागात फेरफटका मारत नागरिकांच्या समस्या जाणून घेतात आणि त्या तातडीने सोडवण्यासाठी पुढाकार घेतात.नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन तत्काळ उपाययोजना करणे, हीच त्यांची खास ओळख बनली आहे. कोणतीही समस्या लहान किंवा मोठी असो, तिच्याकडे गांभीर्याने पाहून ती सोडवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
विशेष म्हणजे, नगरसेवक असूनही त्यांनी कधीही आपल्या पदाचा गर्व केला नाही. साधेपणा, नम्रता आणि सेवाभाव या गुणांमुळे त्यांनी नागरिकांच्या मनात विश्वास आणि आदराचे स्थान निर्माण केले आहे. पदाचा आव न आणता सामान्य नागरिकांप्रमाणे वागणे, ही त्यांची कार्यशैली लोकांना विशेष भावते.
अशपाक शेख यांची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे सर्वधर्मसमभाव. सर्व धर्मांतील नागरिकांना समान वागणूक देत, समाजात एकोपा आणि बंधुता टिकवून ठेवण्याचे काम ते सातत्याने करत आहेत.दिवस असो वा रात्र, ते नागरिकांसाठी नेहमीच उपलब्ध असतात. कोणतीही समस्या उद्भवल्यास तातडीने घटनास्थळी पोहोचून ती सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
अल्पावधीतच आपल्या प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्यांनी प्रभाग क्रमांक ५ मध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले असून नागरिकांच्या मनात आपले नाव लौकिक केले आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे इतर लोकप्रतिनिधींनाही एक आदर्श मिळत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



إرسال تعليق