शिवसेना पदाधिकाऱ्याचा सत्कार

यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हा सहसंपर्कप्रमुख माननीय बाळासाहेब मुनगिनवार व तसेच शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटिका आर्णी विधानसभा सविताताई बेंद्रे यांचा शिवसेना आर्णी तालुका व शहर यांच्या वतीने आर्णी विश्रामगृहावर सत्कार करण्यात आला
यावेळी पुरुषोत्तम पवार, उत्तम राठोड,रमेश ठाकरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना माननीय बाळासाहेब मुनगिनवार म्हणाले पक्षाने परत एकदा माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला जिल्हा सहसंपर्कप्रमुखांची जबाबदारी दिली त्याबद्दल मी पक्ष नेतृत्वाचे मनापासून आभार मानतो यापुढे पक्ष जो आदेश देईल त्या पद्धतीने पक्ष संघटनेचे काम मी करीन सोबतच महिला आघाडी उप जिल्हा संघटिका सविताताई बेंद्रे यांनी पण संघटनेच्या कामात बहुसंख्य महिलांना सामावून घेऊन संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करेन असे सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या
सत्कार समारंभाला शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवि राठोड शहर प्रमुख पंकज शिवरामवार उज्वल मोरे, बबलू देशमुख,अनिल चिंतावार, रमेश ठाकरे, रमेश इंगोले, राहुल लाभशेतवार, अभिजीत शिंदे तसेच तालुक्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी शाखाप्रमुख उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...