*जवळा येथे संदल शरीफ उत्साहात*
जवळा:सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या आर्णी येथील बाबा कंबलपोष उर्स शरीफ निमित्त जवळा येथे भव्य संदल मिरवणूक काढण्यात आली.सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी सर्व जाती धर्माचे लोक प्रामुख्याने सहभागी झाले होते. सदर संदल शरीफ च्या मिरवणुकीमध्ये विविधतेत एकता प्रकर्षाने जाणवत होती. ही जवळ्याच्या मातीची खरी ताकत आहे. भव्य मिरवणूक काढण्यापूर्वी सकाळी बस स्टॅन्ड वर भोजन दान देण्यात आले भोजन दानाचा गाव व परिसरातील शेकडो लोकांनी आस्वाद घेतला. यावेळी कार्यक्रमास , माझी पंचायत समिती सभापती आर्णी राजूभाऊ वीरखडे, सरपंच प्रणिता आडे अजित राठोड, संजय सुखदेवे, आसिफ शेख, धीरज गावंडे, अमोल ठक व समस्त गावकरी यांनी महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना हार अर्पण करून अभिवादन केले यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख राहील, वैभव राठोड(लाली) अमजद शेख, अली खान, अयान खान,रियाज शेख, आलम पठाण, इमरान शेख, रवि जितकर, तुकाराम वानखडे,राहुल शिसोदे, राहुल खंदार, कुंदन रेवनशेटे, विठ्ठल जिरे, नईम शेख, अभी इंगळे, निकेश धनोडे, रुषी टेकाम, लक्ष्मण शिंदे, अमीर शेख, शुभम गुल्हाने, गुणवंत धाये, अमिर खान,इमरान शेख, सचिन जवके व राहील मित्र मंडळ परिवार यांनी प्रचंड मेहनत घेतली. संदल शरीफ द्वारे गावात एकात्मतेचा संदेश दिल्याने आयोजकांचे गावात कौतुक होताना दिसत आहे.
जवळा येथे संदल शरीफ उत्साहात
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा