⚡ ब्रेकिंग News

पत्रकारिता हा समाजाचा आरसा आहे: ठाणेदार शाम सोनटक्के

पत्रकारिता हा समाजाचा आरसा आहे: ठाणेदार शाम सोनटक्के
जवळा:- आर्णी पोलीस स्टेशन ला नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक शाम सोनटक्के यांनी दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पत्रकार सभेचे आयोजन केले होते.पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. समाजातील विविध घटकांचे दुखणे जाणून घेऊन तो त्यावर आवाज उठवतो. खरा पत्रकार समाजामध्ये प्रमुख भूमिका बजावत असतो.असे प्रतिपादन आर्णी पोलीस स्टेशन चे नवनियुक्त ठाणेदार शाम सोनटक्के यांनी पत्रकार सभेत पत्रकारा शी बोलताना केले.
पोलीस स्टेशन च्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने पत्रकार व पोलीस यांच्या संयुक्त विद्दमाने "जे शक्य होईल ते करू" असेही यावेळी ठाणेदार शाम सोनटक्के यांनी पत्रकार सभेत सांगितले व सर्व पत्रकारांची ओळख करून घेतली.यावेळी पत्रकार श्रीकृष्ण जावळकर,राजू इंगोले, आबीद फानन,नौशद अली, राजू कुशहा,हरिओम बघेल,राजेश माहेश्वरी,करण शेलकर, राम होले,अनिकेत खरोळ,विशाल इंगोले,विनोद सोयाम,रफिक सरकार,गणेश धनोडे,गणेश एकंडवार,प्रशिक मुनेश्वर,इम्रान मिर्झा,चंदन राठोड,आरिफ शेख व किशोर पवार उपस्थित होते. कोट......
पत्रकार हा समाजाचा आरसा आहे,आणी तो नेहमी खरी व स्वच्छ प्रतिमा समाजाला दाखवत असतो,ग्रामीण भाग असो किंवा शहर समस्याची माहिती समाज हा पत्रकारांना देत असतो,पत्रकारांच्या सहकार्याने आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करू.यामुळे पोलीस स्टेशन हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून गुन्हेगारीवर वाचक निर्माण करता येईल. शाम सोनटक्के,ठाणेदार पोलीस स्टेशन आर्णी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...