घाटंजीत विदर्भ निर्माण प्रचार यात्रा प्रचार सभा
विदर्भ नेते अँड वामनराव चटप यांनी केले संबोधित
घाटंजी.स्वतंत्र विदर्भ राज्य डिसेंबर 2023 पर्यंत घोषित करा , अन्यथा लाठी खाऊ, गोळा खाऊ पण विदर्भ राज्य मिळवूनही घेवू. अभि नहीं, तो कभी नहीं.विदर्भ मिळवू औंदा, या निर्धाराने संपूर्ण विदर्भात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अँड वामनराव चटप यांचे नेतृत्वात 21फेब्रुवारी ते 5 मार्च 2023 विदर्भ निर्माण यात्रा संपूर्ण विदर्भात प्रचारार्थ काढण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने घाटंजी येथे जयस्तंभ चौकात प्राऊटिस्ट ब्लॉक इंडिया चे मधुकर निस्ताने यांनी सभेचे आयोजन केलं होते. सभेचे अध्यक्ष गुरूदेव सेवा मंडळाचे प्रचारक, सामाजिक कार्यकर्ते, अनंतराव कटकोजवार सर होते. प्रमुख वक्ते अँड वामनराव चटप साहेब यांनी
सभेला संबोधित करताना उपस्थीतांना त्यांनी विदर्भाच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.विदर्भाच्ज्ञा सर्वांगीण विकासासाठी, नक्षलवादाला आळा घालण्यासाठी, प्रदुषण व कुपोषण संपविण्यासाठी, बेरोजगारांच्या रोजगारासाठी एकच उपाय, स्वतंत्र विदर्भ राज्य .
विदर्भावर कशा प्रकारचा अन्याय होत आहे, विदर्भ राज्य झाले तर विदर्भाच्या जनतेचा कसा फायदा होईल,यांची अभ्यासपूर्ण आकडेवारीच
पुढे मांडली. या सभेत वर्धेच्या सभेत मुख्यमंत्र्यांना विदर्भाच्या समस्या चा जाब विचारण्यासाठी गोंधळ घालताना प़ोलीसी अत्याचार सहन करून विदर्भासाठी कफन बांधून घराबाहेर पडलेले तरून तडफदार कार्यकर्ते मुकेश मासुरकर नागपूर, जय विदर्भ पार्टी चे अध्यक्ष अरुण भाऊ केदार, ज्यांनी तरूणपणापासून विदर्भ आंदोलनात खर्ची घातले , त्यांनी आपल्या भाषणातून सांगीतले, विदर्भासाठी मरण आले तरी बेहत्तर,पण मागे हटणार नाही.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राऊटिस्ट ब्लॉक इं�
इंडिया चे प्रदेश अध्यक्ष विवेक डेहणकर सर यांनी सांगितले विदर्भाची मागणी अनेक वर्षांपासून ची आहे, आंदोलन कर्ते नेते मोठे झाले,
विदर्भ राज्य झाले नाही, जनतेने सावध होण्याची गरज आहे. प्लास्टिक ब्लॉक इंडिया अनेक वर्षांपासून विदर्भ आंदोलनात सहभागी आहे, तेव्हा विदर्भ राज्य निर्माण होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे सांगितले.
सभे करीता विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते,
तात्यासाहेब मते, अरविंदजी भ़ोसले, जिल्हाध्यक्ष कृष्णाजी भोंगाडे, मधुसुदनजी कोले, अशोकराव कपी्ले, महिला प्रमुख सोनाली ताई मरगडे, शशीकलाताई झाडे, पीबीआय. जिल्हाध्यक्ष अरूणभाऊ कपीले,शहर अध्यक्ष रविभाऊ कुथे, सामाजिक कार्यकर्ते, नारायणराव भोयर, सुनीलभाऊ देठे, पत्रकार बाळासाहेब ठाकरे, प्राऊटिस्ट मोहण पवार , मनोज राऊत यांची प्रमुख उपस्थिती . कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी भुषण भाऊ शाश्त्रकार, उमेश पवनकर, भिकू डहाके,प्रशांत मानकर, संतोष गोल्हर, गजानन कोटरंगे, महादेव मादेशवार, जितूभाऊ सहारे, अथक प्रयत्न केले.
घाटंजीत विदर्भ निर्माण प्रचार यात्रा प्रचार सभा विदर्भ नेते अँड वामनराव चटप यांनी केले संबोधित
Bhagirath Raja 24 News.com
0



إرسال تعليق