*जवळा येथे शिवजयंती उत्साहात साजरी*
जवळा.
तालुक्यातील जवळा येथे विठ्ठल रुख्मिणी मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उस्ताहात साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज उस्तव समिती व काही प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत वसंत महाराज यांच्या हस्ते सकाळी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले व सायंकाळी 4 वाजता गावातून भव्य रॅली काढण्यात आली यावेळी जवळा येथील सर्व परिसर भगव्याने रंगला होता व गावातील महिलांनी आपल्या घरासमोरील परिसर स्वच्छ करून अंगणात रांगोळी काढल्या होत्या या उस्तहाला प्रामुख्याने राजेंद्र जाधव, राजू वीरखडे,संजय पांडे,आनंद दुर्गे,अमजद पठाण,नरेश रामटेके,प्रणिता आडे,बाबाराव खोडणकर,अनिल चौधरी,धीरज गावंडे,हर्षाली चौधरी, रुचिका एकंडवार, आशाताई भिसे,सीमा चोपडे, प्रदीप पवार, आशु निरपासे,धीरज जयस्वाल व गावकरी उपस्थित होते व या जयंतीच्या उत्सवासाठी छत्रपती शिवाजी महाराज उस्तव, समिती श्री राम नवमी उत्सव समिती, बजरंग दल जवळा च्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
जवळा येथे शिवजयंती उत्साहात साजरी
Bhagirath Raja 24 News.com
0



إرسال تعليق