⚡ ब्रेकिंग News

सावता परिषदेच्या अधिवेशनाला उपस्थित रहा- अमोल ठक जवळा

*सावता परिषदेच्या अधिवेशनाला उपस्थित रहा- अमोल ठक जवळा*
जवळा: अहमदनगर येथे सावता परिषदेचे त्रैवार्षिक अधिवेशन होणार असून या अधिवेशनासाठी यवतमाळ जिल्ह्यातील माळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान सावता परिषद जिल्हा अध्यक्ष अमोल ठक यांनी केले आहे.
समाजाच्या प्रश्नावर मंथन करण्यासाठी सावता परिषदेचे पाचवे त्रैवार्षिक अधिवेशन होणार आहे. हे अधिवेशन नंदनवन लॉन्स येथे ४ मार्च २०२३ शनिवार रोजी संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील सावता परिषद संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांच्या प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमासाठी सर्व माळी समाज बांधवांनी व सावता सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल ठक यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...