आर्णी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदी शाम सोनटक्के यांची नियुक्ती

**आर्णी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदी शाम सोनटक्के यांची नियुक्ती**
आर्णी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदी श्याम सोनटक्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दि. 3 फेब्रुवारीला रात्री 11 च्या दरम्यान पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांचे बदलीचे आदेश धडकले. आणि आर्णी पोलीस स्टेशनचे तत्कालीन थानेदार पितांबर जाधव यांची अचानक बदली झाल्याने शहरासह तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले होते.
पितांबर जाधव यांच्या अचानक झालेल्या बदलीने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे नव्याने रुजू झालेले ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी आपला पदभार दिनांक 4 फेब्रुवारीला सकाळी 11 च्या दरम्यान स्वीकारला आहे आज दिनांक 5 फेब्रुवारी पासून आर्णी शहरात हजरत बाबा कंबपोष र.अ. यांच्या उर्सला सुरुवात होत असून बाबांचा शाही संदल हे दर्गाह वरून निघून बाबाच्या बैठकीच्या ठिकाणी जाऊन चादर चढविली जाते.
तसेच आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या घरून ठाणेदार यांचा मानाचा संदल त्यांच्या डोक्यावर निघतो आर्णी शहरात हजरत बाबा कंंबलपोष र.अ. बाबांची व पोलिसांची एक वेगळीच नाळ जोडलेली असून आर्णी शहरात कर्तव्यावर येणारा प्रत्येक पोलीस कर्मचारी स्वतःला भाग्यवान समजतो अशातच ठाणेदार पितांबर जाधव यांच्या डोक्यावर संदल निघणार हे निश्चित असताना अचानक त्यांच्या बदलीचे आदेश धडकल्याने हा बहुमान आता आर्णीला नव्याने रुजू झालेले ठाणेदार श्याम सोनटक्के यांना मिळणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...