पालकमंञी संजय राठोड यांना निवेदन देतावेळी शिवसेना यूवती आर्णी तालूकाध्यक्ष अश्विनी देशमूख.
आर्णी शहरात नविन शासकीय जागेवर नव्याने शवशिच्छेदनगृह मंजूर करुन देण्यात यावे.
पालकमंञी संजय राठोड यांना शिवसेना यूवतीआर्णी तालूकाध्यक्ष अश्विनी देशमूख यांची निवेदना व्दारे मागणी.
जवळा.
शहरात नविन शासकीय जागेवर नव्याने शवशिच्छेदनगृह मंजूर करुन देण्यात यावे अशी मागणी पालकमंञी तथा अन्न औषधमंञी संजय राठोड यांच्याकडे शिवसेनेच्या यूवती आर्णी तालूकाध्यक्ष अश्वीनी यशवंत देशमूख यांनी ता,18 मार्चला शिवसेना कार्यालय यवतमाळ येथे भेट घेवून निवेदना व्दारे मागणी केली आहे,
आर्णी शहरातील शवशिच्छेदनगृह सन 1980 साला पूर्वीचे असल्याने शवविच्छेदन गृहाला आजरोजी 43 वर्षाचा कार्यकाळ झाल्याने शवविच्छेदनगृह इमारत जुनाट परिस्थीतीत असल्याने दार, खिडक्या तुटल्या आहे, टीनपत्रे जूनाट व फुटके आहे, शवविच्छेदनगृहात पाण्याची व वैद्यकीय अधिकारी,पोलीस तसेच मृतकांच्या कूंटूबीयाना बसण्याची व्यवस्था नाही, सदर इमारती भोवती झाडाझुडपाचे स्वरुप आले आहे, आर्णी शहरातील शवविच्छेदनगृहाचे सन 1980 पासून कुठलेच शासकिय कागदपत्रे नसल्याने शासकीय निधी सुविधे पासुन वंचित आहे, दर आठ दिवसात तालुक्यात चार ते पांच मृत्यु होतात, यामुळे मृतकांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होऊ नये म्हणून आर्णी शहरात नविन शासकीय जागेसह नव्याने शवविच्छेदन गृह निर्माण करण्याची कार्यवाही करुन आर्णी तालुक्यातील शवविच्छेदनगृह समस्या कायमस्वरुपी निकाली काढावी अशी मागणी ता, 18 मार्च 2023 रोजी यवतमाळ येथील शिवसेना कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंञी तथा अन्न औषध प्रशासनमंञी संजय राठोड यांना शिवसेना युवती आर्णी तालूकाध्यक्ष अश्वीनी यशवंत देशमूख ह्यांनी निवेदना व्दारे मागणी केली आहे.
पालकमंञी संजय राठोड यांना निवेदन देतावेळी शिवसेना यूवती आर्णी तालूकाध्यक्ष अश्विनी देशमूख.
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा