सर्वेक्षणात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय # सर्वेमध्ये नुकसान पातळी दाखवली कमी
आर्णी
गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यातील लोणी येथे अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले. झालेल्या वादळीवा-यासह मुसळधार पावसाने आणि सोबतच झालेल्या गारपीटीने शेत शिवारातील गहु,मका,हरभरा ,भाजीपाला, संत्रा फळांचे नुकसान झाले. वादळी वा-यामुळे गहु तसेच मका पिक जमिनदोस्त झाले तरीही झालेली नुकसान पातळी कमी असल्याचे तहसील प्रशासनाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे संप सुरु असताना कुषी विभाग आणि तहसील प्रशासनाने हा अहवाल निरंक पाठविला आहे. याबाबत नुकसान पातळी ही ३३ टक्क्यांहुन कमी दाखवली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी जेव्हा संबंधित विभागाच्या तलाठी आणि कुषीसहाय्यक यांच्यांशी चर्चा केली तेव्हा नुकसान झाले नसल्याचे सांगत शेतकऱ्यांची बोळवण केली. तहसीलदार यांनी सुद्धा संत्रा बागायतदार शेतकऱ्यांना सुद्धा सांगितले की पुन्हा तुम्हाला नुकसान देता येत नाही. शेतातील मका ,गहु पिक आडवे झाले तरीही नुकसान नसल्याचे तलाठी यांनी सांगितले तर कुषीसहाय्यकांनी सर्वेचा आदेश मिळाला नसल्याचे सांगितले. एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला आहे.शेवटी लोणी येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन देवुन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. यावेळी दतात्रय लाड , उपसरपंच अमोल वारंगे,डॉ, किशोर कोषटवार,रमेश काळे ,योगेश चौधरी, गजानन पाटील, अनंत बुट्टेकर, सतिश जाधव,रोहीदास पवार आदी शेतकरी उपस्थित होते,
आर्णी तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान तरीही अहवाल निरंक !
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा