आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ९७.६७ टक्के मतदान
आर्णी
तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अतिशय महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत १८संचालकासाठी ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.३० एप्रिलला निवडणूक झाली. त्याच दिवशी मतमोजणी झाली. या निवडणुकीत १४२० मतदार पैकी १३८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ९७.६७ टक्के मतदान झाले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शेतकरी विकास आघाडी चे १८ पैकी१० उमेदवार निवडून आले .उध्दव ठाकरे शिवसेना गट प्रणित शेतकरी परिवर्तन महाविकास आघाडी पॅनल चे ६ उमेदवार निवडून आले. भाजप, शिवसेना, मनसे प्रणित शेतकरी न्यायहक्क पॅनलला मात्र खातेही उघडता आले नाही. दोन उमेदवार अपक्ष निवडुन आले. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तिहेरी लढत झाल्याने अतिशय चुरशीची झाली.
सहकारी संस्था मतदारसंघात ५२६ मतदाना पैकी ५१७ मतदान, ग्रामपंचायत मतदार संघात ६४० मतदाना पैकी६१९ मतदान, हमाल मापारी संघात १८० मतदाना पैकी१७७, व्यापारी, अडते मतदार संघात ७४ मतदाना ७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामपंचायत गटामधून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शेतकरी विकास आघाडी आणि उद्धव ठाकरे शिवसेना गट प्रणित शेतकरी परिवर्तन महाविकास आघाडी या दोन्ही गटाला एका उमेदवारासाठी दोन वेळा रिकॉटीग करून आखरी ईश्वर चिठ्ठीवर काँग्रेस प्रणित शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी घोषीत करण्यात आले.
मतदान शांततेत पार पडले.
काँग्रेस प्रणित शेतकरी विकास आघाडी ला १० जागा, उद्धव ठाकरे शिवसेना गट प्रणित शेतकरी परिवर्तन पॅनलच्या ६ जागा, अपक्ष ला २ जागा
Bhagirath Raja 24 News.com
0


إرسال تعليق