बस मध्ये व्यापाऱ्याचे पैसे चोरणाऱ्या महिलांना अटक
:- जवळा:अमरावती येथील साडी विक्री चा व्यवसाय करणारा व्यापारी,अमरावती येथून महागाव तालुक्यातील काळी दौलत येथे पैशाच्या वसुली करिता आला असता,महागाव तालुक्यातील अनेक ठिकाणी एकूण ६०,५०० रुपये वसुली करून,महागाव वरून उमरखेड ते नागपूर बस ने जवळ्या ला येण्यासाठी निघाले.बसमध्ये व्यापारी रमेश नंदूलाल वरदानी व एक अनोळखी महिला बसलेली होती.आर्णी जवळ आल्यानंतर व्यापाऱ्याचा डोळा लागताच,त्याच्या बॅग मध्ये ठेवलेल्या पैशांपैकी काही पैसे काढले,ही गोष्ट व्यापाऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी,सर्व हकीकत कंडक्टरला सांगितली.कंडक्टर ने बस जवळा पोलिस चौकी ला थांबवली.पोलिसांच्या मदतीने पंचासमक्ष त्या महिलेचे नाव विचारले असता,राणी राजू हातगाडे वय वर्ष ३५ रा.नेताजीनगर यवतमाळ असे सांगितले.महिलेची पोलिसांनी पंचासमक्ष अंगझडती घेतली असता,महिलेच्या पर्स मधून १९,००० मिळाले.मिळालेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.आरोपी महिलेले चोरी केल्याचे कबूल केले,व तिच्या मदतीला आणखी तीन महिला असल्याचे तीने सांगितले.पोलिसांनी त्यांची नावे विचारली असता,रिता देविदास हातगाडे वय वर्ष ४० रेखा राजू हातगाडे वय वर्ष ४० व रंजू कैलास हातगाडे वय वर्ष ४५ रा.नेताजीनगर यवतमाळ चारही आरोपीनी चोरी केल्याचे कबूल केले.रमेश नंदूलाल वरदानी यांच्या फिर्यादिवरून आरोपी विरुद्ध भा.द.वि चे कलम ३७९,३४ नुसार गुन्हा दाखल करून,अटक करण्यात आली.पुढील तपास बिट जमादार अरुण चव्हाण करित आहे.
बस मध्ये व्यापाऱ्याचे पैसे चोरणाऱ्या महिलांना अटक
Bhagirath Raja 24 News.com
0


टिप्पणी पोस्ट करा