सदर सभेमध्ये तारेंद्र बोर्डे,विजय चोरडिया,राकेश खुराना, यात्रा मार्गदर्शक मुन्ना महाराज तुगणायत,मुकेश साहू, राजकुमार जयस्वाल इत्यादींनी दिनांक 17 ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या कावड यात्रा बद्दल सविस्तर विचार मांडले. त्यानुसार दिनांक 17 ऑगस्ट रोजी वणी ते शिरपूर येथील शिव मंदिर पर्यंत कावड यात्रा निघणार आहे. सदर सभेमध्ये शिव भोलेनाथ कावड यात्रा बाबत आयोजक राजकुमारजी जयस्वाल यांनी सभे मधील उपस्थित सर्व शिवभक्त बांधवांना सविस्तर माहिती दिली. सदर कावड यात्रा मिरवणुकी मध्ये हजारो शिवभक्त स्त्री पुरुष सहभागी होणार असून काही भक्त भोलेनाथ शंकरजी च्या भूमिकेत वेशभूषा घेऊन सामील होणार आहेत. त्यामुळे दिनांक 17 ऑगस्टला वणी शहरामध्ये शिव भोलेनाथमय चे वातावरण दिसणार आहे. असंख्य शिवभक्ताचा समावेश असलेली भोलेनाथ यांची मिरवणूक ही वणीतील जैताई देवस्थान येथून सकाळी ९ वाजता निघणार आहे. सदर मिरवणुक ही ढोल ताशा वाजत गाजत एसटी बस स्टँड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत जाईल.
तिथे पोहोचल्यानंतर मिरवणुकीतील शिवभक्त बांधवांना चहा नास्ताची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यानंतर सदर मिरवणूक ही वाजत गाजत व "जय भोलेनाथ हर हर महादेव" अशा घोषणा देत संभाजी चौक मार्गे म.गांधी चौकात पोहोचेल. म.गांधी चौक नंतर हजारो स्त्री-पुरुष शिवभक्तांनी शिस्तबद्ध निघालेली सदर मिरवणूक ही संत गाडगेबाबा चौक ते शहीद भगतसिंग चौक मार्गे दीपक टॉकीज चौकात (रंगनाथ स्वामी चौक) पोहोचेल. रंगनाथ स्वामी चौकात देखील शिवभक्त बांधवा करिता चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. सदर मिरवणुक ही हजारो शिवभक्तासह वाजत गाजत भोलेनाथच्या घोषणा देत व जय जय कार करीत रंगनाथ स्वामी चौकातून पुढे जाणार आहे. वणी शहरातून सदर मिरवणूक सोबतच ३ बसेस व १० - २० चार चाकी व पिकप वाहन देखील असणार आहे.
ज्या शिवभक्तांना गाडीत बसायचे असेल त्यांच्या करिता बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. काही शिवभक्त वणी ते शिरपूर पर्यंत पायदळ चालणार आहे. सदर कावड यात्रे करिता 50 कावड घेण्यात आलेले असून निशुल्क असणार आहे. ज्या शिवभक्तांना कावड पाहिजे असेल त्यांनी दिनांक 7 ऑगस्टपर्यंत नावे देण्यात यावी. अशा शिवभक्तांना घरपोच कावड पोहोचविण्यात येईल अशी माहिती शिवभक्त राजकुमार जयस्वाल यांनी सभेत दिली. रंगनाथ स्वामी चौकातून सदर मिरवणुक ही लालगुडा मार्गे चारगाव चौकी ते शिरपूर देवस्थान अशी असणार आहे. सदर शिवभक्तां चा काफिला मंदर जवळील "चोरडिया फार्म" येथे पोहोचल्या नंतर वणीतील दानशूर व्यक्तिमत्व विजय बाबू चोरडिया यांच्या तर्फे समस्त शिवभक्तांना चहा, बिस्किट व नाश्ताची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व शिवभक्तांची मांदियाळी पुढे गेल्यानंतर शिरपूर येथे पोहोचताच जयस्वाल परिवाराच्या वतीने राजकुमार जयस्वाल व सौ.श्रद्धा जयस्वाल यांच्याकडून सर्व शिवभक्तांना भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिरपूर येथील टेकडीवर असलेल्या शिवशंकर मंदिराचे जीर्णोद्धारचे बांधकाम सन 2018 मध्ये वणीतील महालक्ष्मी मेडिकलचे नागदेव बंधू यांनी करून दिले आहे. त्यामुळे शिवभक्त शंकर नागदेव यांच्याकडे शिव मंदिर येथील पूजा व तेथील हॉलमध्ये भक्तां करिता थांबण्याची व्यवस्था असणार आहे. सदर कावड यात्रा मिरवणुकी मध्ये वणी शहर तसेच वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील गणमान्य नागरिक, विविध पदाधिकारी व हजारो शिवभक्त प्रेमी सहभागी होणार आहेत. दिनांक 17 ऑगस्ट रोजी वणी येथून शिरपूर पर्यंत काढण्यात येणारी शिव कावड यात्रा यशस्वी करण्या करिता श्री काशी शिव टीम/समिती तसेच त्रिशूल यात्रा समिती कामाला लागली असल्याची माहिती कावड यात्रेचे कार्याध्यक्ष तारेंद्र बोर्डे तसेच काशी शिवमहापुराण समितीचे राजकुमार जयस्वाल यांनी दिली. दिनांक 17 ऑगस्टला निघणाऱ्या शिव भोलेनाथ कावड यात्रे मध्ये सर्व वणीकर शिवभक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन वणीचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, कावड यात्रेचे कार्यकारी अध्यक्ष तारेंद्रजी बोर्डे, व सदर कावड यात्रेचे आयोजक व शिवभक्त राजकुमारजी जयस्वाल यांनी केले आहे. सदर सभेचे संचालन विनायक कोंडावार यांनी केले तर प्रास्ताविक राजकुमार जयस्वाल यांनी केले.
👍🙏
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा