⚡ ब्रेकिंग News

दुचाकीचा भीषण अपघात एक महिला ठार तर दोन जण जखमी

दुचाकीचा भीषण अपघात # जवळा येथील जुन्या पुलाजवळील घटना # एक महिला ठार तर दोन जण जखमी
जवळा:- दहिसावळीवरून लोणीला लग्नासाठी जात असताना,दुचाकी क्र.MH27AK6975 समोर कुत्रा आडवा आल्याने,झालेल्या दुचाकीच्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला.ही घटना जवळा येथील दारव्हा फाट्याजवळ असलेल्या जुन्या पुलाजवळ १०:३० दरम्यान घडली.अन्नपूर्णा गायकवाड वय ६५ वर्ष रा.दहिसावळी ता.महागाव अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे तर प्रदीप गायकवाड वय वर्ष ४२,विपुल गायकवाड वय ८ वर्ष दोघेही रा.दहिसावळी ता.महागाव असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे की,दहिसावळी येथील गायकवाड परिवार दुचाकीवरून लोणी येथे लग्नासाठी जात असताना,जवळा येथील दारव्हा फाट्याजवळ दुचाकी समोर अचानक कुत्रा आल्याने,दुचाकी कोसळून तिघेही खाली रस्त्यावर पडले,यामध्ये अन्नपूर्णा गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला.तर प्रदीप गायकवाड व विपुल गायकवाड गांभीर जखमी झाले.अपघाताची महिती मिळताच जवळा बिटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत कालुसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे पाठविले.पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणपत कालुसे करित आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...