⚡ ब्रेकिंग News

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनो, कुठे नेऊन ठेवली ग्रामपंचायत? | गावकऱ्यांचा सवाल

■ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनो,कुठे नेऊन ठेवली ग्रामपंचायत? | गावकऱ्यांचा सवाल
जवळा ग्रामपंचायतीचा कारभार
पुण्य नगरी / प्रतिनिधी जवळा: : आर्णी तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून जवळा या गावाचे नावलौकिक आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजली जाणारी जवळा ग्रामपंचायत सध्या गावकऱ्यांना सुविधा पुरविण्यास अपयशी होत असल्याचे दिसून येत आहे. पाणी, रस्ते, आरोग्य व प्रकाश व्यवस्था यासह अन्य समस्या गावात आवासून असताना ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे नागरिक त्रस्त आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांच्या समस्यांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनो, कुठे नेऊन ठेवली आमची ग्रामपंचायत, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. जवळावासीयांनी ग्रामपंचायतवर १५ सदस्य निवडून दिले, पण पक्षाला जागरूक न राहता काही सदस्यांनी युती एकाशी करून सत्ता दुसऱ्यासोबत भोगत असल्याचे चित्र घडले. सदस्यांचे लक्ष एकमेकांनवर अविश्वास आनन्यामध्ये लागले आहे. लोकांनी गाव हितासाठी उमेदवार निवडून दिले. निवडून आलेले कारभारी आम्ही गावाचा कायापालट करू, असा विश्वास संपादीत करत आणाभाका घेतल्या. मात्र आज अडीच वर्षे लोटली तरी गावाचा कायापालट झाला नाही. त्यामुळे विकासाच्या नावावर सगळीकडे बोंबाबोंब होतं आहे. गावाचे पाणीपुरवठा नियोजन ढासळले, मुबलक पाणी असूनही दर दहा ते बारा दिवसाला नळाला पाणी येत असून ग्रामपंचायत हद्दीतील अनेक भागात काही पथदिवे बंद राहतात. ग्रामपंचायत परिसरात अस्वच्छता पसरली आहे. ग्रामपंचायतीच्या बाजूलाच आठवडी बाजार मार्केट असून कचऱ्याचे साम्राज्य येथे दिसून येते. गुराढोरांना पिण्याच्या पाण्याचे टाके असूनही टाके साफ, विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्यास त्यांना वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे. गावातील काही मुख्य रस्त्याची बिकट अवस्था असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. अशा विविध समस्या असूनही याकडे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी ग्रामपंचायत प्रशासनाद्वारे पाणीपट्टी, मालमत्ता, वीज व आरोग्य आदी करांची वसुली ग्रामस्थांकडून केली जाते. यात लाखो रुपयांचा महसूल वसुल केला जातो. परंतु सुविधा पुरविण्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे वास्तव्य नागरिक समस्या आहे. ग्रामपंचायतीकडे घेऊन जातात. पण त्यांना समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याची ओरड् ग्रामस्थांतून होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने या समस्या तत्का सोडविण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...