⚡ ब्रेकिंग News

नवीन विहीरीचे बांधकाम खचल्याने मलब्याखाल्ली दबून मजुराचा मृत्यू

*नवीन विहीरीचे बांधकाम खचल्याने मलब्याखाल्ली दबून मजुराचा मृत्यू*
*वरझडी येथें आज घडली घटना* *अकोला बाजार* : यवतमाळ तालुक्यातील वरझडी येथे शेतातील नवीन विहिरीचे बांधकाम सुरु असतांना विहारीची कंगणी खचल्याने बांधकामावर पाणी मारणाऱ्या मजुराचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी 11 वाजता यवतमाळ तालुक्यातील वरझडी शिवारात घडली. रुपेश धनराज ढेंगळे (24) असे मृतक तरुणाचे नाव आहे.
वरझडी शिवरातील आकाश जयस्वाल यांचे शेतात नवीन विहीर बांधकाम सुरु होते. रुपेश हा बुधवारी सकाळी मजूर सुनील चंपत नेवारे (32) रा. वरझडी याचे सोबत शेतातील विहीर बांधकामावर पाणी मारण्यासाठी गेला होता. दोघेही पाणी मारत असतांना विहीर बांधकामाची प्लेट विहिरीत खाली पडली. त्या सोबत सुनील नेवारे हा पाण्यात पडला. यावेळी विहिरीत 20 फूट पाणी होते. सुनील पोहून विहिरीचे काठावर गेला. सुनील पाठोपाठ रुपेशही विहिरीत पडला. त्याला पोहणेही नव्हते. तो पाण्यात पडला आणि क्षणातच वरून विहारीची कंगणी रुपेशच्या अंगावर पडली. त्या मलब्या खाली रुपेश दाबल्या गेला. घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळाली. गावकऱ्यांनी शेतात विहिरीकडे धाव घेतली. तो पर्यंत वडगाव पोलीस ही घटनास्थळी पोहचले. दोन विदयुत मोटार पम्प लाऊन विहिरीतील पाणी उपसले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. मलब्याखाली दबल्याने रुपेशचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती वडगाव जंगल पोलिसांना मिळताच घटना स्थळी एएसआय भाऊराव बोकडे, पोलिस कॉन्स्टेबल प्रेमानंद जेंगठे, धनंजय शेखदार,अक्षय डोंगरे यांनी पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. रुपेश हा कुटुंबात कर्ता पुरुष होता. त्याच्या अपघात्ती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रुपेशचे मागे आई, वडील, भाऊ , बहीण व मोठा आप्त परिवार आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...