जवळा येथील राहुल काळे अकोला कामगार सहाय्यक आयुक्तपदी
जवळा:जवळा येथील राहुल रावसाहेब काळे यांची नुकतीच सहाय्यक आयुक्त पदी अकोला येथे नियुक्ती झाली असून नुकताच त्यांनी अकोला येथे जाऊन सहाय्यक आयुक्त पदाचा (कामगार विभाग) कार्यभार स्वीकारला आहे त्यांच्याकडे यवतमाळ, वाशीम, अमरावती या तीन जिल्ह्याचा जिल्हा कामगार अधिकारी पदाचा सुद्धा कार्यभार आहे राहुल काळे हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सुपरिचित आहे राहुल यांची सहाय्यक आयुक्त पदी निवड झाल्याबद्दल जवळा गावाचे सरपंच, ग्रा.पं. सदस्य, गुरुदेव संस्थेचे सचिव , निसर्ग सेवा समितीचे सदस्य, तसेच संताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव व सर्व संचालक यांनी राहुल काळे यांच्या राहत्या घरी भेट घेऊन त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार केला आहे
जवळा येथील राहुल काळे अकोला कामगार सहाय्यक आयुक्तपदी
Bhagirath Raja 24 News.com
0


टिप्पणी पोस्ट करा