⚡ ब्रेकिंग News

मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड यांनी मलाईदार खाते गमावले

मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड यांनी मलाईदार खाते गमावले
यवतमाळ राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर बहुचर्चित खातेवाटप अखेर बारा-तेरा दिवसांनी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ नव्या मंत्र्यांचा शपथविधीचा कार्यक्रम २ जुलै रोजी झाला होता.त्यानंतर आतापर्यंत खातेवाटप झाले नव्हते. अखेर शुक्रवारी खातेवाटप जाहीर करण्यात आले. त्यात शिंदे गटाला आणि विशेषत: मंत्री संजय राठोड यांना मोठा झटका बसला आहे.
शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना हा झटका बसला. त्यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन हे मलाईदार खाते होते. ते काढून घेतले आहे. यासंदर्भात मेडीकल असोशिएशनकडून त्यांच्या स्वीय सहाय्यकावर आरोप करण्यात आले होते. त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या तसेच आर्थिक प्रकरणाच्या आरोपांची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली गेली. त्यामुळे त्यांची उचलबांगडी होणार असल्याची चर्चा होती. अखेर ती चर्चा खरी ठरली. दरम्यान त्यांचे मोठ्या आवक जावकचे खाते जाऊन आता मृद व जलसंधारण सारखे शेती संबंधित खात्यात त्यांना काम करावे लागणार आहे. येथे त्यांचे मन रमण्याची शक्यता नाही. मात्र आली या भोगाशी.... या म्हणीप्रमाणे त्यांना हे खाते नाईलाजास्तव सांभाळावे लागणार आहे.
बॉक्स जनतेमध्ये नाराजीचा सुर मंत्री संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. जिल्ह्याचे पालकत्व असल्याने संपूर्ण जिल्ह्यात दौरे करून समस्या जाणून घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे मात्र ते दिग्रस-दारव्हा-नेर या त्यांच्या विधानसभा क्षेत्रातच ते विविध कार्यक्रम योजनांबाबत जनजागृती आरोग्य व समाधान शिबीरे घेत असल्याचे दिसून आले. पालकमंत्री असूनही उर्वरित १३ तालुके त्यांनी सावत्र लेकराप्रमाणे वाऱ्यावर सोडली आहे. याचा फटकाही येणाऱ्या काळात शिंदे गटाला बसणार अशी चर्चा खुद्द त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...