⚡ ब्रेकिंग News

महागाव पोलिसांची गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई

महागाव पोलिसांची गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई (सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त)
महागाव पोलिसांनी शहरातील दोन ठिकाणी धाड टाकून गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून सव्वा लाख रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखु जप्त केला. महागाव पोलिसांना शहरातील अभय कमळेश्वर इंगोले (वय २४ वर्ष, रा. वॉर्ड क्र. ०९ )व शेख सद्दाम शेख तयुब (वय २१ वर्ष, रा. चिमनाजी नगर, वॉर्ड क्र. १७ )हे त्यांचे घरी प्रतिबंधीत गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखु साठवुन त्याची विक्री करत आहेत. अशी गोपिनिय माहिती मिळाल्याने विनायक कोत्ते (परि. पोलीसउप अधिक्षक तथा ठाणेदार महागाव) यांनी पथकासह अभय इंगोले याचे घरी छापा टाकुन झडती घेतली असता
राजनिवास सुगंधित पान मसाला चे २०० पॉकेट किंमत अंदाजे ३८,४०० रूपये, एक्स एल १ जाफरानी जर्दा चे २०० पॉकेट किंमत अंदाजे ९,६००/- रूपये, असा एकुण ४८,०००/- रूपयाचा मुद्येमाल तसेच शेख सद्दाम शेख तयुब याचे घरी छापा टाकुन त्याचे घराचे घरझडती मध्ये विमल सुगंधित पान मसाला चे ११५ पॉकेट किंमत १७,२५०/- रूपये, व्ही १ सुगंधित तंबाखु १३० पॉकेट किंमत ३९००/- रूपये, एस आर - १ सुगंधित तंबाखु ३५ पॉकेट किंमत २१००/- रूपये, राज निवास सुगंधित पान मसाला चे पॉकेट किंमत ३८,४००/- रूपये,एक्स एल - १ जाफरानी जर्दा चे २८१ पॉकेट किंमत अंदाजे १३,४८८/- रूपये चा असा दोन्ही ठिकाणचा एकुण १,२३,१३८ /- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
सदरची कार्यवाही मा. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाडवी, उमरखेड यांचे मार्गदर्शनात विनायक कोत्ते (परि. पोलीस उप अधिक्षक तथा ठाणेदार पो. स्टे. महागांव) स.पो.नि. दिपक ढोमणे, पो ना. सुहास कायटे, संतोष जाधव, पो.शि. बालाजी मारकड, म.पो.शि. ज्योती मुंडे, चालक प्रविण इंगोले यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...