ओबीसी जनमोर्चा - महाराष्ट्र राज्य*

*ओबीसी जनमोर्चा - महाराष्ट्र राज्य*
*ओबीसिंचे प्रश्न मार्गी लागणार!*
ओबीसिंच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी आज दि. 29 सप्टेंबर, 2023 रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली होती. सदर बैठकीत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आले:- मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिले जाणार नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांच्या आरक्षणाचा विचार करणार.बिहारच्या सर्वेक्षणाची आकडेवारी प्रसिद्ध झाल्यावर त्यांची सर्वेक्षण पद्धत वापरून राज्याची जातवार जनगणना करणार. ओबीसी वसतिगृहासाठी 52 ठिकाणी भाड्याच्या इमारतींचे प्रस्ताव आलेले आहेत. येत्या बजेटमध्ये त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल. व वसतिगृहे सुरु जेली जातील.
काही अभ्यासक्रमांसाठी क्रीमी लेअरच्या दाखल्याबरोबरच कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला मागितला जातो. अशा परिस्थितीत उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची गरज नाही.बार्टी, सारथी, तारती या प्रशिक्षण संस्थांना नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालानुसार पुरेसा निधी देण्यात येईल. राज्याच्या नोकऱ्यात ओबीसीचा अनुशेष किती आहे हे तपासले जाईल. व तो अनुशेष भरण्याचा विचार करता येईल. बांठीया कमिशनच्या अहवालानुसार स्थानिक स्वराज्यसंस्थामधील ओबीसिंच्या आरक्षित जागांमध्ये 32907 जागांची घट कशी झाली आहे, हे तपासून पहिले जाईल. बिहारच्या सर्वेक्षणाची आकडेवारी प्रसिद्ध झाल्यावर त्यांची सर्वेक्षण पद्धत वापरून राज्याची जातवार जनगणना करणार. आर्थिक महामंडळाकडून व्यवसायासाठी देण्यात येणाऱ्या 15 लाख कर्जरक्कमेवरील व्याज परताव्याची हमी राज्यसरकार देईल. येत्या अर्थसंकल्पत भटके व विमुक्तांसाठी सर्वात जास्त निधीची तरतूद केली जाईल. परदेशी शिष्यवृत्तीसाठी ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या 50 वरून 75 करण्यात येईल.
खुल्या जागेवर पदभरती झालेल्या कर्मचाऱ्यांकडून स्वयं-घोषणापत्र घेऊन आरक्षित पदावर समायोजन करण्याचे चुकीचे प्रकार थांबविले जातील. सदर बैठकीला ओबीसी जनमोर्चाच्या प्रतिनिधीना निमंत्रित करण्यात आले होते. जनमोर्चाचे अध्यक्ष मा. श्री. प्रकाशअण्णा शेंडगे, कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, उपाध्यक्ष सर्वश्री. जे. डी. तांडेल, दशरथदादा पाटील, ज्ञानेश्वर गोरे, विलास काळे, मृणाल ढोलेपाटील, लक्ष्मण गायकवाड, मच्छिन्द्र भोसले, रमेश पिशे तसेच सरचिटणीस सर्वश्री. अरविंद डाफळे, अनिल शिंदे, श्रीमती पल्लवी रेणके, युवाध्यक्ष adv. मंगेश ससाणे, श्री. उमेश कोरराम आणि श्रीमती सुवर्णाताई पाटील, श्री. ठाकरे आदि जनमोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...