शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या कारणाने जवळा येथील सरपंच निवडणूकीला स्थगिती

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या कारणाने जवळा येथील सरपंच निवडणूकीला स्थगिती
# निवडीच्या आदल्या दिवशी जिल्हाधिकारी यांनी काढले पत्र # सरपंच अपात्र झाल्याने काल होणार होती निवड जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील जवळा येथील काल होणारी सरपंच निवडणूक स्थगिती द्यावी असे जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना पत्र दिल्याने निवडणूक रद्द झाली आहे. ही निवडणूक समोर होणार असल्याने गावात खळबळ उडाली आहे. सरपंच प्रणिता आडे यांना ग्रामपंचायत मधील आर्थिक व्यवहार मध्ये अनियमितता असल्या कारणाने आयुक्त कार्यालयाने अपात्र ठरविले होते. त्यानंतर त्यांनी ग्रामविकास मंत्रालयात अपिल केले होते. अशातच शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन होत असल्याने संबंधित अधिकारी आणि शासकीय यंत्रणा कामात असल्याचे कारण समोर करून निवडणूक स्थगित केली आहे.
एकीकडे सरपंच निवड होणार असल्याने गावात राजकीय वातावरण तापले होते. अपात्र झाल्यावर एक महिन्यापासून नवीन सरपंच कोण होणार अशी उत्कंठा लागली असताना काल निवडणूक स्थगितीचे पत्र आल्याने सरपंच निवडीसाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. (श.प्र) #########################
निवडणूकीच्या दिवशी बारा वाजता मिळाले पत्र ### काल २६ आँक्टो रोजी सरपंच निवडणूक होणार म्हणून तयारी सुरू असताना दुपारी बारा वाजता दरम्यान निवडणूक स्थगित करून समोर ढकलण्याचे पत्र मिळाले. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली होती. एकीकडे अपात्रतेची कारवाई झाली त्यानंतर ग्रामविकास खात्याकडे अपिल करण्यात आली. अशातच काल जिल्हाधिकारी यांचे निवडणूक समोर घेण्यात येईल असे पत्र मिळाल्याने गावात तसेच तालुक्यात विविध चर्चेला उधाण आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...