दारव्हा रोडवर पडुन असलेल्या नंदु भुरेस ऊपचारासाठी ऊमरीपठार वृध्दाश्रमाने केले जिल्हा शासकिय रुग्णालयात भरती.
आर्णी.
जवळ्या जवळील दारव्हा रोडवर पडुन असलेल्या नंदु भुरे वय ६५ या वृध्दास संत दोला महाराज वृध्दाश्रम ऊमरीपठार येथे घेवुन आले.वृध्द हा आजारी व अशक्त असुन नाजुक स्थितीत पाहुन वृध्दाश्रम प्रशासनाने ठेवुन घेतले व लगेच दुसऱ्या दिवशी शासकिय जिल्हा रुग्णालय यवतमाळ येथे जयप्रकाश डोंगरे यांनी सदर वृध्दाला औषधोपचारासाठी भरती केले.
वृध्दाचे तपासणीत वृध्दास टी.बी.असल्याचे निष्पन्न झाले. वृध्दाश्रमाचे संस्थापक शेषरावजी डोंगरे व जयप्रकाश डोंगरे वृध्दाची काळजी घेत असुन त्याचेवर औषधोपचार सुरु आहे.तब्येतीने गंभीर अवस्थेत रस्त्याच्या बाजुला पडलेल्या वृध्दास वृध्दाश्रमात आणुन सोडणा-या टॅक्सी ड्रायव्हरचे आणि वृध्दाश्रमातील सेवाभाव जोपासणारे मानवी हृदय पहावयास मिळाले.निराधार होवुन रस्त्याच्या बाजुला पडलेल्या वृध्दास वृध्दाश्रमाने आश्रय देवुन त्याचे तब्येतीची काळजी घेत आहे.व्यथा वेदनेला कुरवाळणे ,दुःखाच्या जवळ जावुन सहकार्य करणे हीच खरी मानवी प्रवृत्ति आहे.
दारव्हा रोडवर पडुन असलेल्या नंदु भुरेस ऊपचारासाठी ऊमरीपठार वृध्दाश्रमाने केले जिल्हा शासकिय रुग्णालयात भरती.
Bhagirath Raja 24 News.com
0


टिप्पणी पोस्ट करा